प्रतिनिधी/ पणजी
गोवा शालांत व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा मे अखेरीस घेतलेल्या परीक्षेचे निकाल साधारणतः 20 ते 21 जुलै या दरम्यान जाहीर केले जाणार आहेत.
यासंदर्भात मंडळाची सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 19,210 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत बनले होते. उत्तरपत्रिका तपासणीचे काम शनिवारी संपुष्टात आले. वास्तविक हे काम अगोदरच संपुष्टात येणार होते, मात्र सांखळी, वास्को व इतर काही भागात छोटय़ा प्रमाणात लॉकडाऊन केल्यामुळे त्या परिसरातील शिक्षकांना पेपर तपासणीसाठी जाणे शक्य झाले नाही. परिणामी, इतर शिक्षकांकडून पेपर तपासणीचे काम करण्यात आले. संपूर्ण निकाल तयार होण्यास आणखी काही दिवस लावतील व 20 किंवा 21 जुलै रोजी निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे.









