पेडणे ( प्रतिनिधी )
गोव्याहून मुंबई येथे औषधे घेवून जाणारे वाहन संत सोहिरोबनाथ आंबिये सरकारी महाविद्यालयाजवळ जवळ एमएच 04 जीआर 8699 हे चालकांचा गाडीवरील ताबा गेल्याने उलटले .व गाडी चालवत असलेला चालक शिवकुमार गुप्ता हा क?बिनमध्ये अडकून पडला. अग्नीशामक अपघाताची माहिती कळताच अग्नी शामक दलाचे अधिकारी व जवान ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली.व अडकुन पडलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले.
पेडणे अग्नी शमन दलाचे अधीकारी प्रशांत धारगळकर चालक रामदास परब , प्रशांत सावळ देसाई जवान , सहदेव चोडणकर विकास चव्हाण , शेखर मयेकर , अविनाश नाईक , प्रदीप आसोलकर , प्रजोत होबळे मनोज साळगावकर ,अमोल परब आदीने अपघात सापडलेल्या चालकाला बाहेर काढले.चालक किरकोळ जखमी झाला.









