बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतच आहे. राज्यात शुक्रवारी २३१३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, त्यापैकी १४४७ रुग्ण बेंगळुरूमधील आहेत. गेल्या २४ तासात राज्यात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. तसेच राज्यात आणि राजधानीमध्ये एका दिवसात अनुक्रमे 57 आणि 29 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नॉन झाली आहे.
बंगळुरूमध्ये सलग दुसर्या दिवशी मुंबई (1,218) आणि चेन्नई (1,205) पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत, ३३४१८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर बेंगळूरमधील एका 93 वर्षीय व्यक्तीने कोरोनावर मात केली आहे. त्या रुग्णाला शुक्रवारी घरी सोडण्यात आले आहे.