खेड/प्रतिनिधी
तालुक्यातील कुंभाड येथील मृत वृद्धेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. वृद्धेच्या मृत्यूने कोरोनाबळींची संख्या 30 वर पोहचली आहे. या वृद्धेस उपचारासाठी चिपळूण येथील कामथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मृत्यूपूर्वी तिच्या स्वॅबचे नमुने घेण्यास आले होते. तीनच दिवसांपूर्वी तिचा मृत्यू झाला होता. चिपळूण येथील रामतीर्थ स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मृत्यू पश्चात तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील कोरोनाबळींची संख्या 3 झाली आहे.









