नवी दिल्ली
मोटरसायकलच्या विक्रीमध्ये रॉयल एनफिल्डच्या इंटरसेप्टरने विक्रीत आघाडी घेतली असून तिने बीएमडब्ल्यूच्या मोटरसायकलीला विक्रीत मागे टाकले आहे. आपल्या रेट्रो लुकसाठी प्रसिद्ध असणाऱया रॉयल एनफिल्डने ही कामगिरी भारतात नोंदवली आहे. पण कंपनीने भारताबाहेरील इतर देशातही चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. जून 2020 मध्ये इंटरसेप्टर या मोटरसायकलने इंग्लंडमध्ये सर्वाधिक विक्री केल्याची नोंद केली आहे. या स्पर्धेत बीएमडब्ल्यू आर 1250 या मोटरसायकलीला मागे टाकले आहे. मोटारसायकल उद्योग संघाने (एमसीआयए) याबाबतची माहिती नुकतीच दिली आहे. ब्रिटनमध्ये यामाहाच्या एनएमएएक्स 125 या मोटरसायकलीने 445 गाडय़ा विक्री करून अव्वल नंबर प्राप्त केलाय तर पाठोपाठ रॉयल एनफिल्डच्या इंटरसेप्टरने 196 गाडय़ांची विक्री करून दुसरा नंबर प्राप्त केलाय.