मुंबई
टाटा समूहाची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला(टीसीएस) चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीमध्ये 7,008 कोटी रुपयांचा निव्वळ लाभ झाला आहे. एका वर्षाच्या अगोदरच्या समान कालावधीच्या तुलनेत 13.81 टक्के कमी आहे. याच दरम्यान कंपनीचा महसूल 0.39 टक्क्मयांनी वधारुन 38,322 कोटी रुपयांवर पोहोचला होता. चालू तिमाहीच्या दरम्यान महसूलावर कोविडचा मोठा परिणाम झाला आहे. यामुळे महामारीत सर्व बाबतीत प्रभाव पडला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने याच दरम्यान 5 रुपये प्रति समभाग डिव्हिडेंडची घोषणा केली आहे. अंतरिम लाभांश इक्विटी समभागधारकांना 31 जुलैपर्यंत देण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 30 जून 2020 रोजी कंपनीचा एकूण महसूल 38,322 कोटी रुपये राहिला आहे. जो एक वर्षाच्या समान कालावधीत 38,172 कोटी रुपये होता.









