ऑनलाईन टीम / हिंगोली :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीचे निकाल लावण्यास विलंब झाला आहे. मात्र, आता हे निकाल लवकरच लावले जातील अशी माहिती हिंगोली दौऱ्यावर असलेल्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली.
त्या म्हणाल्या, बारावीचा निकाल 15 ते 20 जुलै या कालावधीत तर दहावीचा निकाल 31 जुलै पर्यंत जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दहावी बारावीच्या परीक्षांचे निकाल करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
दरम्यान, यंदा मार्च दहावी परीक्षेसाठी 17 लाख 65 हजार 898 आणि बारावीसाठी 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी बसले होते. बारावी सर्व पेपर लॉक डाऊनपूर्वी संपले होते. मात्र, दहावीचा शिल्लक राहिलेल्या भूगोलचा पेपर रद्द करण्यात आला होता.