प्रतिनिधी / सातारा
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दि.७ रोजी काढण्यात आलेल्या आदेशाची कडक अंमलबजावणी सातारा पालिकेच्या मुख्याधिकारी रंजना गगे यांनी करण्यास सुरुवात केली आहे.शहरात जे विना मास्क फिरतात त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आणि सोशल डिस्टनन्स न पाळनाऱ्या व्यापाऱ्यांवर दंड करण्यासाठी एक पथक नेमले आहे.त्या पथकाकडून ऍक्टिव्ह मोडवर कारवाई सुरू आहे.शुक्रवारी मोती चौकातल्या चार दुकानावर कारवाई करण्यात आली आहे.हे पथक अचानक दाखल होते आहे.
कोरोनाची कसलीही धास्ती शहरात दिसत नाही. नियम फक्त कागदावर छानपैकी दिसतात. सातारकर नागरिक, व्यापारी यांच्याकडून नियम पाळले जात नसल्याने कोरोनाचा शिरकाव सातारा शहरात होत आहे. जिल्ह्यातील कोरोना वाढत चाललेला आकडा पाहून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दि.७ रोजी पुन्हा नव्याने कलम १४४ लागू केले आहे. त्यात कारवाईचे अधिकार पालिकेला दिले गेले आहेत. त्याच आदेशानुसार सातारा पालिकेच्या नूतन मुख्याधिकारी रंजना गगे यांनी लगेच त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पथक नेमण्यात आले आहे. या पथकाने कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी मोती चौकात पथकाचे प्रशांत निकम यांनी सोशल डिस्टनन्स न पाळणाऱ्या चार दुकानावर कारवाई केली आहे. सदाशिव पेठ, बलशेठवार स्टेशनर्स, मोमीन ट्रेडर्स अशा चार जणांवर प्रत्येकी 1 हजार दंड वसूल करण्यात आला आहे.पालिकेकडून शहर वासीयांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.