ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात सर्वाधिक म्हणजेच 24 हजार 879 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 487 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 7 लाख 67 हजार 296 वर पोहचली असून, मृतांची संख्या 21 हजार 129 एवढी आहे.
सध्या देशात 2 लाख 69 हजार 789 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 76 हजार 378 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषदेद्वारे देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात 8 जुलैपर्यंत जवळपास 1 कोटी 07 लाख 40 हजार 832 नमुने तपासण्यात आले. त्यातील 2 लाख 67 हजार 061 नमुन्यांचे परीक्षण मागील 24 तासात करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत 2 लाख 23 हजार 724 रुग्ण आढळले आहेत. दिल्ली 1 लाख 4 हजार 864, तामिळनाडूत 1 लाख 22 हजार 350, गुजरातमध्ये 38 हजार 333, मध्यप्रदेश 16 हजार 036, आंध्र प्रदेश 22 हजार 259, बिहार 13 हजार 189, राजस्थान 22 हजार 063, उत्तरप्रदेश 31 हजार 156, केरळ 6 हजार 195, कर्नाटक 28 हजार 877 तर पश्चिम बंगालमध्ये 24 हजार 823 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.