नवी दिल्ली
तब्बल 18 महिन्यांच्या खंडानंतर आंतरराष्ट्रीय हौशी बॉक्सिंग संघटनेने (एआयबीए) मुष्टियोद्धय़ांची क्रमवारी जाहीर केली असून भारताच्या अमित पांघलला या क्रमवारीत 52 किलो वजन गटामध्ये पहिले स्थान मिळाले आहे. त्याने ऑलिम्पिक चॅम्पियन झोइरोव्हला मागे टाकत अग्रस्थानी झेप घेतली आहे.
जानेवारी 2019 मध्ये एआयबीएने शेवटची क्रमवारी यादी जाहीर केली होती. त्यातही फक्त महिला बॉक्सर्सची क्रमवारी देण्यात आली होती. सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या भारताच्या एमसी मेरी कोमला 48 किलो गटात त्यावेळी पहिले स्थान मिळाले होते. नव्या क्रमवारीत मेरी कोमला 1550 गुणांसह तिसरे स्थान देण्यात आले आहे.
वर्ल्ड चॅम्पियनशिप्समध्ये 24 वर्षीय अमित पांघलने रौप्य जिंकले होते. त्याला ताज्या क्रमवारीत 52 किलो गटात अग्रस्थान मिळाले आहे. त्याचे एकूण 1300 गुण झाले आहेत. उझ्बेकच्या झोइरोव्ह शाखोबिदिनची (1200) दुसऱया स्थानावर घसरण झाली आहे.
तर बल्गेरियाच्या असेनोव्ह डॅनियल पॅनेव्हला (1000) तिसरे स्थान मिळाले आहे.
तिची प्रतिस्पर्धी उत्तर कोरियाची पँग चोल मि 2350 गुणांसह पहिल्या तर तुर्कीची बुसेनाझ कॅरिरोग्लू 2000 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. भारताच्या मंजू रानीने महिलांच्या 48 किलो वजन गटात दुसऱया स्थानावर झेप घेतली आहे. तिचे एकूण 1175 गुण झाले आहेत.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एकतेरिनबर्ग, रशिया येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप्समध्ये 24 वर्षीय अमित पांघलने ऐतिहासिक रौप्य जिंकले होते. त्याला ताज्या क्रमवारीत पुरुषांच्या 52 किलो गटात अग्रस्थान मिळाले आहे. त्याचे एकूण 1300 गुण झाले आहेत. अमितचा कट्टर प्रतिस्पर्धी विद्यमान ऑलिम्पिक व वर्ल्ड चॅम्पियन उझ्बेकच्या झोइरोव्ह शाखोबिदिनची (1200) दुसऱया स्थानावर घसरण झाली आहे तर बल्गेरियाच्या असेनोव्ह डॅनियल पॅनेव्हला (1000) तिसरे स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे अमितला एआयबीएने पहिल्यांदाच क्रमवारीत अग्रस्थान दिले आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने नियुक्त केलेल्या बॉक्सिंग टास्क फोर्सने गेल्या फेब्रुवारीत त्याला अग्रमानांकन दिले होते. गेल्या वर्षी मे मध्ये एआयबीएला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी महिला व पुरुष बॉक्सर्ससाठी मानांकन जाहीर केले आहे.
एआयबीएमधील भारतीयांचे मानांकन
पुरुष : दीपक (48 किलो, 6 वे स्थान), अमित पांघल (52, पहिले), कविंदर बिश्त (56, चौथे), शिवा थापा (60, 16 वे), मनीष कौशिक (64, सहावे), आशिष (69, 19 वे), आशिष कुमार (75, 13 वे), संजीत (91, 12 वे), सतीश कुमार (91 वरील, 23 वे स्थान).
महिला : मंजू रानी (48 किलो, दुसरे स्थान), मेरी कोम (51, तिसरे), पिंकी रानी (51, 13 वे), निखत झरीन (51, 21 वे), जमुना बोरो (54, पाचवे), मनीषा (54, 13 वे), सोनिया लाथेर (57, चौथे), सरिता देवी (60, 25 वे), सिमरनजित कौर (64, सहावे), लवलिना बोर्गोहेन (69, तिसरे), पूजा रानी (81 किलो, आठवे स्थान).









