ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात हॉटेल्स आणि लॉज सुरु करण्याची परवानगी मिळाली आहे. येत्या 8 जुलैपासून हॉटेल आणि लॉज सुरु केले जाणार आहेत. मुख्य सचिव यांनी याबाबतचे आदेश जारी केले. मिशन बिगीन अगेन अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र कंटेन्मेंट झोनमध्ये सध्या तरी हॉटेल आणि लॉज सुरु करता येणार नाही, असे यात नमूद करण्यात आले आहे. मुंबई, पुणे, औरंगाबादमध्ये कंटोनमेंट झोन वगळून परवानगी देण्यात आली आहे.
राहण्याची क्षमता असलेल्या हॉटेल्समध्ये 33 टक्के ग्राहकांना राहण्याची परवानगी 8 जुलैपासून देण्यात आली आहे. तसेच रेस्टॉरंटस बाबत अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

जर या संस्था क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरात असल्यास महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाच्या पुढील आदेशापर्यंत त्या क्वारंटाईन सुविधेसाठीच वापरल्या जातील. किंवा त्यांचा उर्वरित भाग (67 टक्के) महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाकडून क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरला जाऊ शकतो, असेही यात नमूद केले आहे.









