प्रतिनिधी/ रत्नागिरी
दापोली तालुक्यातील आंजर्ले व दाभोळ येथील दोघांचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाल़ा आंजर्ले येथील प्राथमिक आरोग्य केंदात काम करणाऱया कोरोना योध्दा आरोग्यसेवकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आह़े अशा प्रकारे शासकीय कर्मचाऱयाचा मृत्यू होण्याची जिह्यातील पहिलीच घटना आह़े मृतामध्ये दाभोळ येथील 68 वर्षीय वृध्दाचा समावेश आह़े यामुळे जिह्यातील मृतांची सख्या 28 इतकी झाली आह़े दरम्यान रविवारी नव्याने 14 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याने जिल्हय़ातील कोरोनाबाधितांची संख्या 710 वर पोहोचली आहे.
यामध्ये 6 जिल्हा कोवीड रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय कामथे येथे 6 तर उपजिल्हा रूग्णालय कळंबणी येथे 2 रूग्णांना दाखल करण्यात आले आह़े जिह्यातील एकूण रूग्णांची संख्या आता 710 वर पोहोचली असून सध्या 207 रूग्ण उपचाराखाली आहेत़ आंजर्ले येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे काम करणाऱया आरोग्यसेवकाला ताप जाणवू लागला होत़ा शरीरातील पांढऱया पेशी कमी झाल्याने त्यांना 30 जून रोजी जिल्हा रूग्णालय येथे दाखल करण्यात आले होत़े रूग्णालयाकडून करण्यात आलेल्या कारोना चाचणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या संबंधी उपचार करण्यात येत होत़े मात्र रविवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल़ा तर दापोली तालुक्यातील दाभोळ येथील 68 वर्षीय मृताचा अहवाल पॉझिटिव्ह आला आह़े या रूग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच हदयविकाराचा आजार होत़ा या रूग्णाचा रूग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत्यू झाला. या वृद्धावर पाच वर्षांपूर्वी बायपास झाली आहे. त्याची मुंबई ट्रव्हल हिस्ट्री नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
राजापुरात सापडला दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
राजापूर: लागोपाठ दुसऱया दिवशी कोरोनाचा आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण राजापूर शहरानजीक मिळाल्याने सर्वत्र घबराट पसरली आहे. रविवारी सापडलेला हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण राजापूर बाजारपेठेतील व्यापारी असल्याने संक्रमण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या रुग्णाची कोणतीही प्रवासाची हिस्ट्री आढळलेली नाही.
शुक्रवारी सायंकाळी राजापूर शहरातील साखळकरवाडी येथे एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या 52 जणांपैकी हायरिस्क असणाऱया 23जणांचे स्वॅब घेवून त्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित 29 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर साखळकरवाडीसह लगतचा खडपेवाडी भागही कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे. तर शनिवारी रात्री उशीरा आलेल्या अहवालानुसार राजापूर शहरातील व्यापारी व कोदवली येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याला पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या दीड वर्षे वयाच्या मुलीलाही रविवारी सकाळपासून ताप आल्याने तिलाही रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या घरातील व आजूबाजूच्या घरातील काही व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरु आहे तर राजापूर बाजारपेठेसह अन्य ठिकाणी त्याच्या संपर्कात अजून कितीजण आले आहेत का, याचीही चौकशी सुरु आहे. पाठोपाठ 2 दिवस शहरात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्याने सर्वत्र घबराट पसरली आहे. कोदवली गुरववाडीसह अन्य काही नजीकचा भाग कंटेनमेंट झोन करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरु केली आहे. खेडमध्ये आणखी दोघांना कोरोनाची बाधा
खेड: तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत असून शनिवारी रात्री आलेल्या अहवालानुसार आणखी दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे. हे दोघेही रूग्ण घरडा वसाहतीतील आहेत. या नव्या रूग्णांमुळे कोरोनाबाधितांची संख्या 109 वर पोहोचली आहे. कोरोनाचाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाची चिंता दिवसागणिक वाढतच आहे.









