वार्ताहर / पाटगांव
पाटगांव मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेले दोन मुसळधार पाऊस पडत असून मौनी सागर जलाशयाच्या पाण्याची पातळीत सातत्याने वाढ होत असून धरण क्षेत्रातील मुसळधार पावसाने धरणात ४६ % पाणीसाठा झाला आहे तर कोंडूशी लघुप्रकल्प धरण १०० % भरले आहे यामुळे सुमारे तीनशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून पिण्याचा पाण्याचा व शेतीचा प्रश्न सुटणार आहे.
भुदरगड तालुक्यातील फये, कोंडूशी, मेघोली हे तीन लघुप्रकल्प असून यापैकी कोंडूशी पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यातून मोठया प्रमाणात विसर्ग होत आहे .पाटगांव परिसराला गेले दोन दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढले असून पाटगांव परिसरातील ओढे नाले तुडूब भरून वहात आहे . गेल्या चोवीस तासात पाटगांव धरण परिसरात सुमारे ९० मि.मि. पावसाची नोंद झाली आज अखेर १९०० मि.मि. पाऊस पडला पाटगांव मौनी सागर जलाशयातील पाणीसाठा ४७.२९द.ल.घ.मी. एवढा झाला असून कोंडूशी लघुप्रकल्पामध्ये ८९एम सी एफ टी साठा झाला आहे उर्वरीत फये लघुप्रकल्प ८.१६ %, मेघोली ३० % धरण भरले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








