प्रतिनिधी / खंडाळा
खंडाळा तालुक्यातील क्षेत्र वडजलवाडी येथे रविवारी दि. ५ रोजी होणारा गुरूपौर्णिमा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याची माहीती संयोजकांनी दिली.
तालुक्यातील क्षेत्र वडजलवाडीमध्ये असणाऱ्या श्री जय गिरीणारी दत्तात्रय नवनाथ प्रकट देवस्थान मार्फत भक्तांना निवेदन करण्यात आले आहे. रविवार दि.५ रोजीचा गुरुपौर्णिमा कार्यक्रम व त्यानिमित्त होणारा पारायण सोहळा करोना महामारीच्या संकटामुळे रद्द् करण्यात आला आहे. त्यामुळे भक्तांनी मंदिरात येवून विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन देवस्थान मार्फत करण्यात आले आहे.
Previous Articleएस. टी. महामंडळात दुसऱ्या ही दिवशी आढळला कोरोना पॉझिटिव्ह
Next Article इचलकरंजीकरांच्या चिंतेत भर; आणखी ४ पॉझिटिव्ह








