संचार बंदी तूर्तता नाही; नागरिकांना पाच दिवस आधी सांगून निर्णय
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर,
सोलापूर शहर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. सोलापूर शहराचा लॉकडाऊन वाढवण्याची ही मागणी आलेली आहे. मात्र सोलापूरचा लॉकडाऊनचा निर्णय लोकप्रतिनिधींशी, प्रशासनाची चर्चा करून घेणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आज शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान सद्या संचारबंदी करणार नाही. सोलापूरचा लॉकडाऊन करण्याच्या पाच दिवस आधी नागरिकांना सांगून निर्णय घेऊ असेही भरणे यांनी सांगितले.
कोरोनाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे सोलापूर दौऱ्यावर आले होते. आज शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सोलापूर शहर जिल्ह्यात कोरोना बाधित व्यक्तींची संख्या व मृतांची संख्या कमी करण्यासाठी लॉकडाऊन घेण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. मात्र सोलापुरातील स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनाश, व्यापारी नागरिक यांच्याशी चर्चा करून सोलापूरच्या लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
लॉकडाऊन करत असतानाच सोलापुरातील एक लाख नागरिकांची रॅपिड अँटीजन टेस्ट केली जाणार आहे. या टेस्टमध्ये आढळलेल्या कोरोनाबाधित व्यक्ती व त्यांच्या संपर्कातील व्यक्ती यांच्यावर उपचाराची अलगीकरण व विलगीकरण याची सर्व व्यवस्था झाल्यानंतरच लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल असेही भरणे यांनी सांगितले. सोलापूरचा लॉकडाऊन हा अचानक केला जाणार नाही. किमान पाच दिवस अगोदर लॉकडाऊन बाबत कल्पना देऊन निर्णय घेण्यात येईल.
अनलॉकमध्ये गर्दी अन रुग्णही वाढत आहे
सोलापूर शहर जिल्ह्यात अनलॉक करण्यात आला आहे. मात्र प्रत्येकाने ऑनलाइन झाल्यानंतर बाहेर पडलेच पाहिजे असे नाही. गरज असेल तर बाहेर पडणं ठीक आहे पण गर्दी वाढत आहे आणि सोलापुरातील रुग्णही वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य खबरदारी घेत गरज असल्यावरच बाहेर पडावे. शासनाने सांगितलेले नियम पाळावे. सोशल डिस्टेंस ठेवण्याची गरज असल्याचे भरणे यांनी सांगितले. त्यामुळे लॉकडाऊन विषयी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









