ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. आता तर कोरोना रुग्णांच्या संख्येने 3 हजार आकडा पार केला आहे.
शुक्रवारी उत्तराखंडात 64 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3048 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, काल आढळलेल्या रुग्णांमध्ये अल्मोडामधील 8, बागेश्र्वर 3, चमोली, चंपावन आणि हरिद्वार मध्ये प्रत्येकी दोन, तर देहरादूनमध्ये 21, नैनिताल 13, पिथौरागड 1 आणि ऊधमसिंह नगरमधील 12 जणांचा समावेश आहे.
दरम्यान, उत्तराखंड राज्यात आतापर्यंत 2481 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 498 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले.