प्रतिनिधी/ लांजा
लांजा बाजारपूल येथे एका रिक्षाला भरधाव स्विफ्ट कारने मागून दिलेल्या जोरदार धडकेत रिक्षासह कारही पऱयात कोसळल्याची घटना घडली आहे. गुरूवारी रात्री 10 च्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत रिक्षाचालक कासम रफिक नाईक (25, ऱा लांजा नेवरेकरवाडी) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
या प्रकरणी लांजा पोलिसांनी कारचालक अल्फाज अकबर नेवरेकर (ऱा लांजा) याला ताब्यात घेतले आह़े पेलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कासम नाईक हा गुरूवारी रात्री आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच 08 एक्यू 3994) घेवून बाजारपूल येथून जात होत़ा यावेळी पाठीमागून येणाऱया नेवरेकर याच्या ताब्यातील स्विफ्ट कारने (एमएच 08एएन 1594) †िरक्षाला जोरदार धडक दिली. यामध्ये रिक्षा 50 फुटांपेक्षा जास्त अंतरावर फरफटत गेली त्यानंतर रिक्षासह कारही नाल्यात कोसळली.
या अपघातात रिक्षाचालक कासम नाईक हा गंभीर जखमी असून रिक्षाचे माठे नुकसान झाल़े जखमी अवस्थेत उपचारासाठी प्रथम लांजा ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होत़े मात्र त्या ठिकाणी नाईक याची प्रकृती चिंताजनक बनली होत़ी यामुळे अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आह़े या प्रकरणी पुढील तपास लांजा पोलिसांकडून करण्यात येत आह़े
घरगुती वादातून कृत्य?
दरम्यान हा अपघात म्हणजे घरगुती वादातून केलेले कृत्य असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये ऐकू येत आहे. कारचालकच्या घरातील मंडळींसोबत बाहेर जाण्यावरून काही वाद झाला होता. त्यामुळे घरच्यांनी रिक्षा बोलावली होती. मात्र या रिक्षावाल्याशीही संबधीताने वाद घालत त्याला हाकलून लावले होते. त्यानंतर त्याच रागात त्याने रिक्षाचा पाठलाग करत धडक दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळू शकले नाही.









