तरुण भारत संवाद सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 61 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 14 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी शुक्रवारी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी 148 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 61 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 87 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 61 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 45 पुरुष आणि 16 स्त्रियांचा समावेश आहे. उपचारादरम्यान 5 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 476 झाली आहे.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 4402
-पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 476
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 24
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 261
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 192
-प्राप्त तपासणी अहवाल : 4354
-प्रलंबित तपासणी अहवाल : 48
-निगेटिव्ह अहवाल : 3878