बीले न भरण्याचे तालुक्यातील नागरिकांना आवाहन
प्रतिनिधी / पन्हाळा
कोरोना संसर्गामुळे मार्चच्या अखेर पासुन संपुर्ण देशात लाँकडाऊन पुकारण्यात आले होते.त्यामुळे सर्व व्यवहार बंद होवुन अनेकांना आपले रोजगार बुडावण्याची वेळ आली.सध्या सर्वत्र आर्थिक मंदीची झळ बसत असुन अनेकांना आपल्या दैनंदिन गरजा भागविणे देखील कठीण बनले आहे.त्यातच महावितरण कडुन राज्यातील वीज ग्राहकांना तीन महिन्याचे एकत्रित व त्यातच नेहमीपेक्षा ज्यादा दराने वाढीव वीज बिल आल्याने मोठी डोकेदुखी सर्वसामान्य नागरिकांना जाणवत आहे.या वाढीव वीजबिलासंदर्भात आज पन्हाळा तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पन्हाळ्यातील महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.यावेळी जोरदार घोषणाबाजी देवुन वाढीववीज बिल माफीच्या मागणीसह महावितरण्याच्या भोंगळ कारभाराचा निषेध करण्यात आला.तसेच मागणीचे निवेदन पन्हाळा महावितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता अमोल राजे यांना देण्यात आले.
या दिलेलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की,आज कोरोनीच्या संकटात संपुर्ण भारतदेशासह महाराष्ट्र देखील सापडला आहे.अशा परिस्थितीत लोकांना रोजगार उपलब्ध नाही.गरिबांच्या पोटा पाण्याचा विषय एैरणीवर आहे.अशातच गेल्या तीन महिन्याचे मिळुन एकत्रित व वाढीव बील ग्राहकांना देण्यात आले आहे. पण या वीजबीला मध्ये काही गडबड असल्याचे दिसुन येत आहे.कोरोनाच्या अगोदरच्या काळामध्ये ज्या कुटुंबाला 300 ते 400 रुपये महिना वीजबील येत होते ते ते तीन महिन्याचे मिळून 5 ते 7 हजार च्या घरात आले आहे. महावितरणाच्या या भोंगळ कारभाराबद्दल सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. तसेच ही वाढीव वीज बिले अशा या पडत्या काळात भरायची तरी कशी असा गंभीर प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर उभा राहिला आहे.
एकंदरीत अशा या आर्थिक मंदीच्या काळात वीजबिले कमी दरात येणे अथवा ती माफ होणे अपेक्षित होते .मात्र वाढीव वीज बिल आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे .सध्या कोणाच्या हाताला काम असल्याने हे संपूर्ण वाढीव वीज बिल शासनाने माफ करावे .मार्च महिन्याच्या अगोदर प्रतियुनिट 1 ते 100 ला 3.5 दर होता .तो आता वाढून 3.46 एवढा दर झालेला आहे .तर स्थिर आकार 10 वरून 10. इतका झालेला आहे. ही अन्याय वाढ तात्काळ थांबविण्यात यावे व हे वाढलेली युनिट दर पूर्वीप्रमाणे करून सामान्य माणसाला आधार द्यावा.
तरी या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन वीज बिले माफ करावी.अन्यथा तीव्र लढा उभारण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यावेळी देण्यात आला .यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पन्हाळा तालुकाध्यक्ष विशाल मोरे, जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, तालुका उपाध्यक्ष नमन गायकवाड ,सचिव लखन लादे, अमर बचाटे ,रमेश मेहकर, निहाल मुजावर, राम लादे ,राहुल मिटके, रघुनाथ पाटील, सागर पाटील, राहुल जाधव, सौरभ मोरे यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जोपर्यंत वाढीव विज बिलासंदर्भात शासनस्तरावरून योग्य तो निर्णय होत नाही तोपर्यंत तालुक्यातील कोणत्याही ही वीज ग्राहकांनी बिले भरू नये असे आवाहन तालुकाध्यक्ष विशाल मोरे यांनी केले आहे.
Previous ArticleMetformin औषध आता कोरोना रुग्णांसाठी सुद्धा लाभदायक?
Next Article आषाढी एकादशीनिमित्त सावनीचे ऑनलाईन कॉन्सर्ट








