ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात चीन सोबतच्या लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या चर्चेत एक मोठा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार संरक्षण मंत्रालयाने रशियाकडून 33 लढाऊ विमाने खरेदी करण्याची घोषणा केली. यासाठी 18 हजार 148 कोटी रुपये खर्च येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या करारानुसार भारत रशियाकडून सुखोई -30 आणि मिग -29 ही लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. यामध्ये 12 सुखोई -30 आणि 21 मिग -29 विमाने आहेत. याशिवाय भारताकडे आधीपासूनच असलेली मिग -29 ची 59 रशियन लढाऊ विमाने अद्यावत केली जाणार आहेत.
तसेच संरक्षण मंत्रालयाने 248 अतिरिक्त एअर मिसाईल खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. ही मिसाईल भारतीय नौदल आणि हवाईदलाला वापरता येतील. शिवाय डीआरडीओ द्वारे विकसित 1 हजार किमी रेंजच्या क्रूज मिसाईलच्या प्रारूपालाही परवानगी देण्यात आली आहे.