ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाचा लढा अधिक प्रभावी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार मुंबईच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये डॉक्टरांचे टास्क फोर्स नेमण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी दिली.

याआधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबईच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टरांचे टास्क फोर्स तयार करण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या या सूचनेनंतर मुंबईच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स नेमण्यात येणार असल्याचे अमित देशमुख यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले होते की, मुंबई येथे आपण डॉक्टरांचा टास्क फोर्स आपण स्थापन केला त्याचा चांगला उपयोग झाला. त्यामुळे जिल्हा किंवा विभागात असा फोर्स टास्क करणे गरजेचे आहे. त्यानतंर आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात डॉक्टरांचे टास्क फोर्स स्थापन केले जाणार आहेत.









