ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी ‘डेक्सामेथासोन’ हे औषध वापरण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिली आहे.
‘डेक्सामेथासोन’ हे औषध संधीवात, अॅलर्जी, दमा आणि काही प्रकारच्या कॅन्सरमध्ये उपचारासाठी वापरले जाते. हे औषध कोरोनावर प्रभावी ठरत आहे. डेक्सामेथासोन हे जेनेरिक स्टेरॉइड प्रकारातील औषध असून, विशेषत: व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांवर उपायकारक आहे. अद्याप सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये या औषधाचा कितपत फायदा होत आहे, याबाबत संशोधन झालेले नाही.
त्यामुळे मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या तसेच ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांवर डेक्सामेथासोन औषधाने उपचार करायला परवानगी देण्यात आली आहे. WHO ने यासंदर्भात सल्ला दिला होता.