प्रतिनिधी / वारणानगर
येथील वारणा महाविद्यालया मध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात संपन्न झाली. या निमित्ताने महाविद्यालयाचे नूतन प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांच्या हस्ते राजर्षी च्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. महाविद्यालयाच्या “वारणा” भित्तीपत्रक विशेषांकात लोकराजा शाहू यांच्या जीवन कार्यावर आधारित ५० हून अधिक दुर्मिळ छायाचित्रांचे प्रकाशनही डॉ. चिकुर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी भित्तीपत्रक विभाग प्रमुख प्रा.यु.जी. जांभोरे, प्रा. व्ही. जी.सावंत, डॉ बी.के. वानोळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. उपप्राचार्य पी. एस. पाटील,डॉ. डी. डी. सातपुते, डॉ एम जी शिंदे, डॉ डी आर धेडे, डॉ. एस एस. जाधव,कार्यालयीन प्रबंधक बी.जे.लाडगावकर त्यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी अर्ध पुतळ्यास विनम्र अभिवादन करुन दर्शन घेतले.
वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय मध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त दुर्मिळ भित्तीपत्राच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ. प्रकाश चिकुर्डेकर. संयोजक यु. जी. जांभोरे, प्रा. व्ही. जी. सावंत व सहकारी प्राध्यापक.