प्रतिनिधी/इस्लामपूर
बहे येथील रामलिंग बेट परिसरात कृष्णा पदी पात्रात हेलीपॅड जवळ येथील जेनिशा भवन पोरवाल(६) ही बालिका बुडाली. ही घटना बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. तिचा सायंकाळ पर्यंत शोध सुरु होता. पण अद्याप ती मिळून आली नाही.
जेनिशा ही आपल्या कुटुंबियांसमवेत रामलिंग बेट परिसरात पर्यटनासाठी गेली होती. कुटुंबातील बहुतांशी महिला तिच्या समवेत होत्या. पात्रातील हेलीपॅड जवळ जावून फोटो काढत असताना, जेनिशा ही नदी पत्रात पडली असल्याची चर्चा आहे. काही समजण्यापुर्वीच ती वाहून गेली. नातेवाईकांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण यश आले नाही. येथील लाल चौक परिसरातील शालीमार ड्रेसेसचे मालक भवन पोरवाल यांची ती मुलगी आहे. जेनिशा नदीत बुडाल्याने पोरवाल कुटुंबीयांच्या दुःखाला पारावार उरला नाही. या घटनेची माहिती गांधी चौक व लाल चौकात समजताच अनेक व्यापाऱ्यांनी रामलिंग बेट परिसरात धाव घेतली. दरम्यान इस्लामपूर पोलीस ही घटनास्थळी पोहचले. पोलीस व नागरीकांनी नदीपात्रात या बालिकेचा शोध घेतला. बोरगाव येथील बोट आणण्याचा निर्णय झाला. पण अंधार पडल्यानंतर शोध कार्य थांबले. त्यामुळे गुरुवारी पुन्हा शोध कार्य सुरु करावे लागणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








