प्रतिनिधी/वारणानगर
जनुकीय परावर्तीत,एचटीबीटी बियाणेची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी भारतीय किसान संघाच्या पन्हाळा तालुका अध्यक्ष डॉ. सुचेता कोरे यानी पन्हाळा तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, सद्या पेरणीस उपलब्ध असलेल्या बियानाबाबत असे निदर्शनास आले आहे की कोणत्याही प्रकारच्या चाचण्या न करता बाजारात जनुकीय परावर्तीत बियाणे विक्रीसाठी आल्यामुळे नागरिकांच्या जिवितांस गंभीर धोका उत्पन्न होण्याची शक्यता असून कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारांचा आधीच प्रादूर्भाव वाढत असून अशा बेकायदेशीर बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी डॉ. सुचेता कोरे व आनंद बादरे यांनी केली आहे.
Previous Articleचिपळुणात दोन सख्या बहिणी बुडाल्या, एकीला वाचवण्यात यश
Next Article दिलासा : सोलापूर ग्रामीण भागात आज नवा रुग्ण नाही








