पणजी / प्रतिनिधी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आल्तनो येथील आपल्या शासकीय निवासस्थानी माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे काढण्यात आलेल्या ’नवे पर्व’ मॅगझिनचे विमोचन केले.
यामध्ये विविध स्तरावर सरकारने केलेल्या कामगिरीवर प्रकाश टाकण्याबरोबरच विविध क्षेत्रांमध्ये केलेली उल्लेखनीय कामगिरीवर भर देण्यात आला आहे.
नवे पर्वमधील विविध विषयांवरील लेख हे माहिती व प्रसिद्धी खात्याच्या अधिकाऱयांनी लिहिलेले असून, ते उपयुक्त व माहितीयुक्त ठरणारे आहेत. यामध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, माहिती व प्रसिद्धी खात्याचे सचिव श्री. संजय कुमार, आयएएस, माहिती व प्रसिद्धी खात्याच्या संचालक श्रीमती मेघना शेटगांवकर आदींच्या संदेशांचा समावेश आहे. तसेच माहिती सहायक श्री. श्याम गांवकर यांनी घेतलेल्या खास मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचाही समावेश आहे.
विमोचन समारंभाला माहिती व प्रसिद्धी खात्याच्या संचालक श्रीमती मेघना शेटगांवकर, माहिती अधिकारी श्री. प्रकाश नाईक आणि माहिती सहायक श्री. श्याम गांवकर उपस्थित होते.
खात्यातर्फे काढण्यात आलेली सुधारित नवीन टेलिफोन डिरेक्टरी 2020 सर्व सरकारी खात्यांना उपलब्ध करून देण्यात येईल असे खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.









