ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाहन चालकांना कारोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, याआधी राज ठाकरे यांच्या शासकीय सुरक्षा रक्षकांना देखील कोरोनाची लागण झाली होती. हे दोघे उपचारांनंतर कोरोनामुक्त झाले आहेत. पण आता राज ठाकरे यांचे वाहन चालक यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे. राज ठाकरे राहत असलेल्या दादर परिसरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सोमवारी दादरमध्ये 16 तर माहीममध्ये 21 रुग्ण आढळले. त्यामुळे चिंता वाढली असून या परिसरात पालिकेकडून अधिक खबरदारी घेतली जात आहे.
सध्या मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 62 हजारच्या पुढे असून आता पर्यंत 34 हजार 131 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.