ऑनलाईन टीम / पुणे :
निकाल लावण्यासाठी वेगाने प्रक्रिया सुरू असून, 15 जुलैपर्यंत बारावीचा आणि जुलै अखेरपर्यंत दहावीचा निकाल लावण्यात येईल, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी दिली.
काळे म्हणल्या की, यंदा मार्च दहावी परीक्षेसाठी 17 लाख 65 हजार 898 आणि बारावीसाठी 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी बसले होते. बारावी सर्व पेपर लॉक डाऊनपूर्वी संपले होते. मात्र, दहावीचा शिल्लक राहिलेल्या भूगोलचा पेपर रद्द करण्यात आला. ओपन निकाल लावण्यासाठीची प्रक्रिया वेगाने सुरू असून 15 जुलैपर्यंत बारावीचा जुलै अखेरपर्यंत दहावीचा निकाल लावला जाईल, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुढे त्या म्हणाल्या की, 97 टक्के उत्तरपत्रिका या कोरोना काळात परीक्षकांकडून जमा करण्यात आल्या असून, स्कॅनिंग ही वेगाने सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
तसेच दहावीचा निकाल लागल्यानंतर जवळपास दीड महिने अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया चालेल. या वर्षापासून ऑनलाइन पोर्टलमध्येही आवश्यक ते बदल केले जात आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शुल्क भरणे, डिजिटल पुस्तिका, मोबाईल ॲप यासारख्या सुविधा दिल्या जातील. तर एक जुलैपासून महाविद्यालयांचे नोंदणी सत्र सुरू होईल असेही काळे यांनी सांगितले.








