ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे 200 जवान मारले गेले आहेत. तसेच चिनी सैन्य भारतीय हद्दीत 135 किमी आत घुसले आहेत, अशी एका काँग्रेस नगरसेवकांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी नगरसेवक जाकीर हुसैन यांना अटक केली आहे.
भारत-चीनमध्ये 15 आणि 16 जूनला झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. तर 70 हून अधिक जवान जखमी झाले आहेत, असे लष्कराकडून सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात 200 ते 250 जवान शहीद झाले आहेत. चीनचे 43 जवान मारले गेल्याचे सांगण्यात येते. मात्र, चीनचा एकही सैनिक मारला गेला नाही. भारतीय सीमेत चिनी कमांडो आत आले. त्यांनी भारतीय जवानांना मारून पळ काढला.
भारत चीनचे काहीही करू शकणार नाही. चीन लेहचा अर्धा भाग ताब्यात घेईल, असे या ऑडिओ क्लीपमध्ये म्हटले आहे. ही क्लीप व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये संतप्त भावना निर्माण झाली आहे.