निवेदनाद्वारे करणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी
प्रतिनिधी / सातारा
गेल्या तीन महिन्यापासून संपूर्ण जग कोरोनाच्या रोगाने ञस्त आहे. आपण तर संपूर्ण देश लॉकडाऊन करून पाहिला तरीही हा रोग अजूनही आटोक्यात आला नाही परंतु सुरूवातीला असणारी भिती आता बरीचशी कमी झाली आहे. योग्य काळजी घेतल्यास कोरोना हा आजार बरा होऊ शकतो हा विश्वास जनतेत निर्माण करायला शासन आता यशस्वी होऊ लागले याच पार्श्वभूमी वर शासनाने लोकांच्या श्रध्देचा आस्थेवाईक विचार करून जिल्ह्यातील देवस्थाने सोशल डिस्टसींगच्या मार्गदर्शक तत्वाला अनुसरून मुखदर्शनासाठी खुली करावी अशी विनंती मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याची माहिती शिवसेवा उपजिल्हाप्रमुख व श्री.सेवागिरी देवस्थानचे विशस्त श्री.प्रताप जाधव यांनी दिली.
देश आता अनलॉकच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. अत्यावश्यक सेवा तर लॉकडाऊनमध्येही चालू होत्या पण आता लोकांच्या भौतिक गरजा पुर्ण करणाऱ्या गोष्टी काही निकषाच्या आधारे सरकारने सुरू केल्या आहेत. देव तर लोकांच्या भावनेचा विषय आहे. आता चालू असलेल्या आषाढ महिन्यात तर महाराष्ट्रातील तमाम वारकरी आपल्या मायबाप विठुराया भेटायला पंढरपूरला जातात. पण सोशल डिस्टटींगच्या निकषामुळे यावर्षीची वारी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे तमाम वारकरी समाज व जनतेचा हिरमोड झाला आहे. विठुरायाच्या दर्शनाने जगण्याची उर्जा पंढरपूरवरून घेऊन जाणाऱ्या वारकरी भक्तांना व समाजाला आप-आपल्या गावातील व परिसरातील देवस्थाने काही निकषाच्या आधारे खुली करून ताकद द्यावी अशी मागणी जाधव यांनी केली आहे.








