हुपरी /प्रतिनिधी
एका शेकाऱ्याच्या मालकीच्या शेत जमिनीत मारलेल्या बोअरची सातबारा उताऱ्यावर नोंद करून घेण्यासाठी हुपरी (ता. हातकणंगले) येथील तलाठी कलाप्पा देवाप्पा शेरखाने हे 2000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. पहिली घटना घडून सहा महिने पूर्ण होण्याच्या आतच दुसरी घटना घडल्याने नागरिकांच्या मनात संताप निर्माण झाला आहे.
हुपरी हे ठिकाण पाच गावाच्या तलाट्याचे मंडळ केंद्र आहे. या ठिकाण्याचे तलाठी कलाप्पा शेरखाने व मंडल अधिकारी पुजारी यांच्याकडे हुपरी हे ऑडिशनल चार्ज होता. सातबारा पत्रकी नोंद घालण्यासाठी तलाठी यांच्याकडे हुपरीतील एका शेतकऱ्यांने मालकीच्या शेतात पाण्यासाठी बोअर मारले होते. त्या बोअरची रीतसर सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तलाठी कलप्पा देवाप्पा शेरखाने(वय54,रा. संभाजीपुर आण्णासाहेब चकोते शाळेसमोर जयसिंगपूर, नोकरी–हुपरी सजा) यांनी त्या शेतकऱ्याकडे 3000रुपयांची लाच माघीतली होती. शेतकऱ्यांने रक्कम कमी देण्याचा प्रयत्न केला परंतु नोंद करून घेण्यास टाळाटाळ करीत होता शेवटी 2000 रुपये देण्याचे ठरले होते.
सध्या कोरोनाचा फैलाव असल्याने आर्थिक परिस्थिती बिकट होऊन जगणे कठीण झाले आहे अशा परिस्थितीत तलाट्याने मानसिक त्रास दिल्याने आपल्यावर अन्याय होत असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर यांना सांगितले.
दरम्यान पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खोत, पोलीस नाईक पोरे, कदम, घोसाळकर यांचे पथक तयार करून रंगेहाथ पकडण्याचा सापळा रचला .शुक्रवार 19रोजी दुपारी 2-30वाजण्याच्या सुमारास तलाठी शेरखाने शेतकऱ्याकडून 2000 रुपयांची घेताना रंगेहाथ पकडले. त्याचेवर कारवाई करून हुपरी पोलिसांनी त्याचेवर कारवाई करून हुपरी पोलिसांत रीतसर नोंद करून कोल्हापूरला रवाना केले.
हुपरीत दोन वर्षांच्या कालावधीत दोन मंडल आधिकार आणि जानेवारी2020 ला तत्कालीन तलाठी अविनाश राजेश तांबवेकर हा लाच घेण्यास जबाबदार असल्यामुळे निलंबित करण्यात आले होते. सहा महिने पूर्ण आगोदरच शेरखाने यांच्यावर दुसरी कारवाई होते हे किती लाजिरवाणी गोष्ट आहे .अशा लाच खाणाऱ्या अधिकाऱ्यामुळेच हुपरी गावाची बदनामी होत असल्याची चर्चा नागरिकांतून सुरु आहे