वार्ताहर/गोकुळ शिरगाव
मोबाईल व्हाट्सअप वर चॅटिंगमध्ये शिवीगाळ केल्यामुळे कागल पंचतारांकित एमआयडीसी मध्ये एकावर तलवार हल्ला झाल्याची घटना घडली आहे. यात, अमरजीत अशोक लाड (वय-37, रा. लाईन बाजार कसबा बावडा कोल्हापूर) याच्या डोक्यावर, हातावर व पोटावर तलवार मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात काल, मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, कागल पंचतारांकित एमआयडीसीमध्ये आर्या स्टील समोर अमरजीत लाड व बन्सीलाल गुजर या दोघांच्या मध्ये मोबाईल व्हाट्सअपवर चॅटिंग सुरू असताना एकमेकाला चॅटिंगवर शिव्या देण्याचा प्रकार चालू होता. यातूनच राग अनावर झाल्याने बन्सीलाल गुजर (रा.आर्या स्टील रोलिंग, कागल एमआयडीसी मुळगाव राजस्थान) याने अमरजीत याच्या डोक्यावर, हातावर व पोटावर तलवार मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर अमरजीतने गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुजर यांच्यावर विरोधात रात्री उशिरा तक्रार दाखल केली. याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसांनी गुजर यांच्यावर गुन्हा नोंद केला. या घटनेचा अधिक तपास सपोनि रविकांत गच्चे करीत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








