ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
ताजिकिस्तानमध्ये आज सकाळी सातच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.8 रिश्टर स्केल एवढी होती. तर भूकंपाचे केंद्रबिंदू ताजिकिस्तानमधील दसहांबेपासून 341 किमी अंतरावर होते. त्यामुळे जम्मू-काश्मीरलाही या भूकंपाचे धक्के जाणवले.
जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी पहाटे 4.36 वाजता ही भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल एवढी होती. गेल्या काही दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के अनेक वेळा जाणवले आहेत. 9 जून रोजी देखील सकाळी 8:16 वाजता 3.9 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. सुदैवाने या भूकंपात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.