प्रतिनिधी / वडूज
कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानावर ऑनलाईन शिक्षण या एकमेव पर्यायासाठी वंचित राहत असलेल्या दरावस्ती टाकेवाडी या अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या शाळेतील उपक्रमशील शिक्षिका भारती आकाराम ओंबासे मॅडम यांचा अभिनव उपक्रम “माणुसकीची भिंत” या धर्तीवर “डोनेट युअर ओल्ड स्मार्टफोन” हा उपक्रम सुरू केला आहे.
तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे, पण माण तालुक्यातील अतिदुर्गम भागातील दरावस्ती शाळा ही अप्रगतविहीन, गुणवत्तेत सरस, कोणत्याही स्पर्धेत पूढे असणारी शाळा. नुकत्याच मंथन, बी डी एस व अक्षरगंगा स्पर्धा परिक्षेत 24 पटापैंकी 12 विद्यार्थी देशाच्या, राज्याच्या, जिल्ह्याच्या, तालुक्याच्या यादीत बसले आहेत. छोटी शाळा असुनही शिक्षण बंद नाही. या शाळेतील भारती ओंबासे मॅडम यांनी छोट्या छोट्या घटकावर साध्या सोप्या भाषेत व्हिडिओ बनविले आहेत. पण प्रत्येक विद्यार्थ्यांला ते पाहता येत नाहीत. कारण त्यांच्याकडे स्मार्ट अँड्रॉइड मोबाइल फोन नाहीत. या साठी तेथील पालकांची परिस्थिती ही नाही त्यामुळे ओंबासे मॅडम यांनी हा उपक्रम सुरू केला, त्याला लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.हा सर्व शिक्षकांनाही प्रेरणादायी उपक्रम आहे.
अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरावस्ती टाकेवाडी तालुका – माण जिल्हा – सातारा या शाळेतील 25 गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण पालक, शिक्षक व समाजाचा एक भाग म्हणून आपले सामाजिक उत्तरदायित्व पार पाडून या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हातभार लावूसामाजिक स्वयंसेवी संस्था व समाजातील ज्येष्ठ समाजसेवक यांनीदेखील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावावा.
जे दानशूर व्यक्ती या वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपले जुने चालू असणारे अँड्रॉइड स्मार्टफोन दान करून मदत करू इच्छित असतील त्यांनी कृपया आपली माहिती ती खालील लिंकवर भरावी आपणापर्यंत आम्ही प्रत्यक्ष पोहोचू व आपण देऊ करत असलेली मदत स्वीकारण्यात येणार आहे.
https://docs.google.com/forms/d/1sdV_7WLFHLET3PjLrLxq5h2f0nhte_1mmpShlgQTxh8/edit?usp=