ऑनलाईन टीम / मुंबई :
सामानाच्या संपादक आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना पितृशोक झाला आहे. त्यांचे वडील माधव गोविंद पाटणकर यांचे अल्पशा आजाराने सोमवारी निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. मुंबईतील अंधेरी येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. माधव पाटणकर यांच्या निधनावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शोक व्यक्त केला आहे. माधव पाटणकर यांच्या निधनामुळे पाटणकर व ठाकरे कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली वाहिली.