प्रतिनिधी / वाळपई
सत्तरी तालुक्मयात कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. मोर्ले घोडेमळ या ठिकाणी आणखीन दोन रुग्णांची भर पडल्यामुळे आता मोर्ले येथील पॉझिटिव रुग्णांची संख्या 17 तर सत्तरी तालुक्मयातील एकूण रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली आहे.
कासार वाडय़ावरील नागरिकांची चाचणी घेण्याचे काम आरोग्य खात्याच्या साखळी विभागातर्फे करण्यात येत आहे. सदर वाडय़ावरील चाचणी पूर्ण झाल्यानंतर या विभागातर्फे देऊळवाडा भागातील चाचणी करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
सध्यातरी तालुक्मयात एकूण 22 रुग्ण आढळून आल्यामुळे वेगवेगळय़ा ठिकाणी टाळेबंदी करण्यावर नागरिकांची मागणी जोर धरू लागली आहे. याच पंचायत क्षेत्रात शेजारी असलेल्या केरी व पर्ये आदी ठिकाणी नागरिकांत भीती निर्माण झाली असून सदर भागातील नागरिक टाळेबंदी करण्यासाठी मागणीवर जोर देत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे









