प्रतिनिधी / सांगली
तक्रारदार यांचे मुलावर संजयनगर पोलीस ठाणे येथे विविध कलामान्वये गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयाच्या तपासामध्ये मदत करतो व चार्जशीट लवकर पाठवितो म्हणून पोलीस हवालदार फडतरे यांनी दहा हजार रुपयांची मागणी केली असलेची तक्रार सदरच्या व्यक्तीने अॅन्टी करप्शन ब्युरो, सांगली कार्यालयास दिली होती. त्यानंतर रविवारी तक्रारदार याला संजयनगर पोलीस ठाणे येथे बोलावुन घेवुन लाचेची मागणी करून तक्रारदार यांचेकडून २,०००/- रूपये लाच रक्कम स्विकारले असताना पोलीस फडतरे याला रंगेहात पकडण्यात आले आहे.
संतोष बाळकृष्ण फडतरे, वय ४६ वर्षे पोलीस हवालदार, ब. नं.५८०, यांचे विरुध्द संजयनगर पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक गुरूदत्त मोरे, व प्रशांत चौगुले तसेच पोलीस कर्मचारी,अविनाश सागर, संजय संकपाळ, संजय कलकुटगी, रविंद्र धुमाळ, श्रीपाद देशपांडे, सलीम मकानदार, धनंजय खाडे, प्रितम चौगुले, सोहेल मुल्ला, सारीका साळुखे-पाटील, राधिका माने, सिमा माने, चालक बाळासाहेब पवार यांनी ही कारवाई केली आहे.
Previous Articleवसगडे – माळवाडी मार्गावरील ‘ती फांदी’ जीवघेणी
Next Article केंद्राकडून नुकसानग्रस्तांना भरीव मदत मिळवून देणार








