साहित्यः अर्धा किलो चिकन, अर्धी वाटी स्वीटकॉर्न, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, 5 ते 6 लसूण पाकळय़ा चिरून, 1 अंडं, 200 ग्रॅम पनीर मॅश करून, अर्धा चमचा शुगर पावडर, 2 चमचे कोथिंबीर चिरून, 1 चमचा लाल तिखट पावडर, 2 चमचे धणे पावडर, 1 चमचा काळीमिरी पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर, 3 चमचे तेल, चवीपुरते मीठ, आवश्यकतेनुसार बेडक्रम्स
कृतीः चिकन स्वच्छ करून कुकरमध्ये घालावे. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून कुकरच्या दोन अथवा तीन शिट्टय़ा घ्याव्यात. चिकन गार झाले की त्यातील पाणी निथळून मिक्सरला लावून त्याचा कीमा बनवून घ्यावा. स्वीटकॉर्न मिक्सरला लावून भरडसर वाटून बाऊलमध्ये काढावे. त्यात कांदा, लसूण, कोथिंबीर, लाल तिखट पावडर, मीठ, काळीमिरीपूड आणि गरम मसाला पावडर घालून मिश्रण मिक्स करावे. नंतर त्यात बारीक केलेले चिकन मिक्स करावे. आता त्यात पनीर, धणे पावडर आणि शुगर पावडर टाकून मिश्रण मिक्स करावे. बाऊलमध्ये अंडं फोडून फेटून घ्यावे. चिकनचे छोटे गोळे बनवून अंडय़ामध्ये घोळवावेत. शेवटी बेडक्रम्समध्ये घोळवून गरम तेलात सोनेरी रंगावर तळावेत. आता तयार बहारदार कबाब सॉससोबत खाण्यास द्या.









