ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकच्या रावळपिंडी शहरात लष्कराच्या मुख्यालयाजवळ असलेल्या बाजारात शुक्रवारी बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून, 15 जण जखमी झाले आहेत.
पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, एका दुचाकीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले होते. ही दुचाकी एका वीजेच्या खांबाजवळ ठेवण्यात आली होती. त्यामुळे घटनास्थळी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य हाती घेतले.
या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, 15 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटना स्थळ सील केलं असून, तपास पथक आणि फॉरेन्सिक सायन्स लॅब घटनास्थळी तपास करत आहेत.









