गंगाधर पाटील / बेळगाव
कोरोनामुळे लग्न समारंभावर निर्बंध लादण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याआधी अनेक विवाह ठरले होते. अनेकांचे साखरपुडे झाले होते. मात्र कोरोनामुळे त्यांना विवाह करणे अशक्मय झाले होते. तर काही जणांनी नियमांचे पालन करत केवळ मोजक्मयाच व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह पार पाडला. कोरोनामुळे अनेकांचा खर्च वाचला तर कोरोनामुळे नोंदणी पद्धतीने विवाह करण्यावर भर दिला. एखाद्या मंदिरामध्ये विवाह करायचा त्यानंतर त्याची तातडीने विवाह नोंदणी जोडप्यांनी केली आहे. कोरोनाच्या काळात तब्बल 413 जोडप्यांनी विवाह नोंदणी करुन आपली रेशीम गाठ घट्ट केली आहे.
कोरोनामुळे माणसाची जीवनशैलीच पूर्णतः बदलली आहे. रोजच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला. याचबरोबर समारंभ किंवा इतर कार्यक्रमांची रुपरेषा देखील बदलली असून अनेक बंधने आली आहेत. त्या बंधनांचे पालन करत कार्यकम किंवा समारंभ असो तसेच विवाह असो, तो साजरा करावा लागत आहे. प्रत्येक जण मोठय़ा हौसेने आपल्या मुलामुलींचा विवाह करतो. आताच्या नव्या पिढीने तर विवाहाला वेगळे स्वरुप दिले आहे. चित्रपटामध्ये ज्याप्रमाणे विवाह समारंभ केले जातात. त्याच पद्धतीने अनेक जण विवाह समारंभ करत होते. यासाठी भला मोठा खर्च देखील करण्याची तयारी ते करत होते.
अतिउत्साही व्यक्तींना धडा
विवाह समारंभांना सुरुवात झाली की बाजारपेठ सज्ज होत होती. मंगल कार्यालय परिसरही गजबजलेला असतो. विवाहासाठी मोठी जमवाजमव केली जाते. बॅन्ड, वरात हे तरी आता सर्वच जण काढताना दिसत होते. अलिकडे विवाह देखील वेळेवर होत नसल्याच्या घटना अनेकवेळा घडल्या होत्या. मंदिराकडे किंवा मंडपाकडे वराला आणताना त्याची मित्रमंडळी तालावर थिरकत होते. यामुळे विवाह मुहूर्त निघून जात होता. याबाबत अनेकांनी तक्रारी देखील केल्या. मात्र एक मित्रांची हौस आणि पाहुण्यांच्या हौसेपोटी सारेजण त्याकडे दुर्लक्ष करत होते. मात्र आता अशा अतिउत्साही व्यक्तींना कोरोनानेच चांगलाच धडा शिकविल्याचे दिसून आले.
विवाह समारंभ सोशल मीडियावरुन व्हायरल
कोरोनामुळे आता कुणाचा विवाह कधी झाला हे देखील समजणे अवघड झाले. केवळ दोन्ही कुटुंबांतील मोजक्मयाच व्यक्तींच्या उपस्थितीत आणि विवाह मुहूर्तावर विवाह उरकल्यामुळे इतरांना फक्त अमूक याचा विवाह झाला याचीच माहिती मिळत आहे. तोंडाला मास्क घालून झालेले विवाह सोशल मीडियावरुन व्हायरल झाले. हे देखील एक नवलच म्हणावे लागेल. अशी परिस्थिती येईल असे कोणालाच वाटले नव्हते. कोरोनाने मुहूर्तावर विवाह करण्यास साऱयांनाच भाग पाडल्याचे आता बोलले जात आहे.
कोरोनामुळे वायफळ खर्च वाचला
कोरोनामुळे वायफळ खर्च वाचला आहे. वधू-वराकडील दोन्ही कुटुंबांची होणारी धावपळ, वेळ आणि वायफळ खर्च वाचला आहे. मात्र कोरोनाच्या काळात देखील उपनोंदणी कार्यालयामध्ये तब्बल 413 विवाह नोंदणी झाली. या आकडेवारीवरुन दरवषी प्रमाणेच विवाह पार पडले, हे स्पष्ट दिसून येत आहे. विवाह झाले तरी खर्च मात्र वाचल्याने अनेकांतून समाधान व्यक्त होत आहे.
दरवषी तुळशी विवाहानंतर विवाहांना सुरुवात होते. महत्त्वाचे म्हणजे अनेक जण सुटीमध्येच अधिक विवाह करण्याकडे भर देतात. कारण परगावावरुन येणारे आपले नातेवाईक असोत किंवा इतर मंडळी असोत. सुटी असेल तर आवर्जून ते विवाहाला हजर राहू शकतात. यासाठी एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांमध्ये सर्वात जास्त विवाह होत असतात. विवाह झाल्यानंतर तातडीने त्याची नोंद करण्यासाठी जोडपी उपनोंदणी कार्यालयाकडे येत असतात. मात्र आता थेट विवाह नोंदणी कार्यालयातच येऊन नोंदणी पद्धतीने विवाह अनेक जणांनी केल्याचे दिसून आले. याचबरोबर 27 आंतरजातीय विवाहांची नोंद झाल्याचेही उपनोंदणी अधिकारी विष्णू तीर्थ यांनी सांगितले.









