प्रतिनिधी/ बेळगाव :
कोरोनामुळे शेतकऱयांना मोठा फटका बसला आहे. भाजी उत्पादक शेतकरी कोरोनामुळे हैराण झाले आहेत. कारण भाजी खरेदीदारच नसल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली होती. भाज्यांचे दर गडगडले होते. याचबरोबर विविध समस्यांमुळे शेतकरी अडचणीत आला होता. सरकारने जी मदत केली आहे. ती काही मोजक्मयाच शेतकऱयांपर्यंत पोहोचली आहे. तेंव्हा सर्व शेतकऱयांना मदत मिळण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी खानापूर तालुक्मयातील शेतकऱयांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
मिरचीचे दर गडगडले होते. मिरची खपत नसल्यामुळे शेतकऱयांना शेतातच काढुन फेकावी लागत होती. याचबरोबर इतर भाजीपाल्यालाही खरेदीदार नसल्याने शेतातच कुजवून टाकावी लागली. सरकारने शेतकऱयांसाठी पॅकेज जाहीर केले. मात्र ते पॅकेज काही शेतकऱयांना फायदेशीर ठरले तर काही शेतकऱयांना काहीच रक्कम मिळाली नाही. तेंव्हा त्याचा गांभीर्याने विचार करुन ज्या शेतकऱयांना नुकसान भरपाई मिळाली नाही त्यांनानुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
शिरस्तेदार एम. एम. नदाफ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे अशोक यमकनमर्डी, गुरुलिंगया पूजार, गंगाप्पा हिरेकर, महादेव सागरेकर, वासु तिप्पण्णावर, मंजुनाथ हुलीकट्टी, शिवाजी अंबडगट्टी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.









