तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात नव्याने 3 कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली तर बाधित रुग्णामध्ये 1 पुरुष, 2 स्त्रियांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 33 रुग्ण बरे होऊन घरी गेली आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 103 कोरोबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 64 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी गुरुवारी दिली.
पॉझिटिव्ह रुग्णामध्ये समर्थ नगर अक्कलकोट 1, गुळवे नगर अकलूज 1, मौलाली गल्ली अक्कलकोट 1 इतके रुग्ण आढळले आहेत. आज 37 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 3 पॉझिटीव्ह तर 34 अहवाल निगेटिव्ह आले. अद्याप 39 अहवाल प्रलंबित आहेत. 103 रुग्णांपैकी 63 पुरुष 40 स्त्री आहेत. तालुक्यात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 33 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 11
बार्शी – 19
माढा- 7
माळशिरस – 3
मोहोळ- 4
उत्तर सोलापूर – 9
सांगोला – 3
पंढरपूर 7
दक्षिण सोलापूर – 40
एकूण – 103
होम क्वांरटाईन – 2254
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 1774
प्राप्त अहवाल- 1735
प्रलंबित अहवाल- 39
एकूण निगेटिव्ह – 1633
कोरोनाबाधितांची संख्या- 103
रुग्णालयात दाखल – 64
आतापर्यंत बरे – 33
मृत – 6








