वाळपई प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयातील मोर्ले या गावांमध्ये कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या आठवर पोहोचल्यानंतर या पंचायत क्षेत्रातील सर्व वाडय़ावर पूर्णपणे टाळेबंदी लागू करण्यात आलेली आहे .आजपर्यंत या भागातील सर्वांची सामूहिक चाचणी करण्यात आली असून त्यासंदर्भातील नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. सदरचे निकाल आज रात्री उशिरा किंवा उद्या उपलब्ध होण्याची शक्मयता असून त्यामध्ये पॉझिटिव रुग्णांची संख्या आढळल्यास या भागांमधील परिस्थिती अत्यंत विचित्र स्वरूपाचे होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे .
दरम्यान मोर्ले गावातील घोडेमळ वाडय़ावरील नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू पुरवण्याची निवेदन स्थानिक पंचायतीला दिले असून या संदर्भात आशादायी निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती पंचायतीच्या सुत्राकडून उपलब्ध झालेली आहे.
याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयातील मोर्ले पंचायत क्षेत्रांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या आठवर पोहोचलेली आहे .मात्र नागरिकांच्या म्हणण्यानुसार सदर संख्या दहा असून आरोग्य खात्याची यंत्रणा यासंदर्भात चुकीची माहिती देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे .मात्र या भागांमध्ये रुग्णांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाल्यामुळे भागांमध्ये आरोग्य खात्याची यंत्रणा अत्यंत सक्रियपणे काम करताना दिसत आहे. साखळी व वाळपई रुग्णालयाच्या कर्मचाऱयांच्या माध्यमातून गेल्या दोन दिवसात याभागातील सर्व नागरिकांची प्राथमिक तपासणी करण्यात आली असून त्यासंदर्भाचे नमुने म्हापसा व फोंडा याठिकाणी तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. त्या संदर्भाचा अहवाल अजूनही स्पष्ट झालेले नाही .आज रात्री उशिरा किंवा गुरुवारी सकाळी सदर अहवाल प्राप्त होण्याची शक्मयता सूत्रांनी स्पष्ट केलेली आहे.
एकुण 8 नाही 10 रुग्ण.
दरम्यान आरोग्य खात्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोर्ले भागांमध्ये सर्वप्रथम आरोग्य खात्यात काम करणारा कर्मचारी पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांची तपासणी करण्यात आल्यानंतर सदर कर्मचाऱयाची पत्नी दोन कन्या व 1 मुलगा असे एकुण 5 झाले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या सदर भागातील एकूण 60 जणांची प्राथमिक चाचणी करण्यात आली होती. यामध्ये अन्य पाच जण पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले होते .यामुळे सध्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार रुग्णांची संख्या दहा झाली आहे. मात्र आरोग्य खात्याचे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार हे रुग्ण संख्या आठ असल्याचे सांगण्यात येत आहे.
जीवनावश्यक वस्तू पुरवा.
दरम्यान यापंचायत क्षेत्रातील या गावावर रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात आढळून आल्यानंतर सदरवाडा पूर्णपणे लाँकडाऊन करण्यात आलेला आहे. घरांमधून कोणीही बाहेर पडू नये अशा प्रकारचे निर्देश सदर भागातील नागरिकांना देण्यात आलेले आहेत. यामुळे त्यांच्या समोर जीवनावश्यक वस्तू प्राप्त करण्यासाठी अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे आज सकाळी या भागातील नागरिकांनी स्थानिक पंचायतीला एक निवेदन सादर केले असून त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू पुरविण्याची विनंती केले आहे.
यासंदर्भात सरपंच विद्या सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की या संदर्भातील निवेदन पंचायतीला आलेली आहे . यामुळे त्यांच्या निवेदनावर निश्चित प्रमाणात सर्व पंच सभासदांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. सदर कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तू पुरवणे अत्यंत गरजेचे आहे .कारण त्यांना घरातून बाहेर न पडण्याचेआवाहन केलेले आहे .यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तू विकत घेण्यासाठी अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
केसरकरवाडा,घोडेमळ,कासारवाडा,
देऊळवाडा,गिमयवाडा आदी आदी ठिकाणी पूर्णपणे लाँकडाऊन करण्यात आलेली आहे.









