कबनूर / प्रतिनिधी
चंदुर तालुका हातकणंगले येथील अनेक शेतकरी प्रधानमंत्री किसान योजने च्या लाभा पासून वंचित आहेत. अध्यापही त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही त तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेतील रक्कम ताबडतोब जमा करावी अशी मागणी चंदूर विकास युवा मंचच्या वतीने तलाठी धूत्रे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली . चंदुर येथील बऱ्याच शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेचे फॉर्म भरून न ही देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नाही.
शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे का जमा होत नाहीत याची सविस्तर माहिती घ्यावी व त्यातील त्रुटीची दुरुस्ती करून ते फॉर्म अध्यावत करून घ्यावेत व या योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा कसे वेळ होईल याची व्यवस्था करावी व त्यांना दिलासा द्यावा असे निवेदनात म्हटले आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व संचार बंदी मुळे शेतकरी आर्थिक टंचाईत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देऊनआर्थिक दृष्ट्या हातभार लावावा यासाठी आपण जरूर प्रयत्न करावेत.बंडा पुजारी किरण चव्हाण प्रसाद पाटील विकास माने संभाजी पुजारी विनायक गुरव जगदीश पाटील यांच्या निवेदनावर सह्या आहेत चंदू विकास मंच युवा मंच कार्यकर्त्यांनी तलाठी धूत्रे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.
Previous Articleकोरोना आपत्ती अनुदान मागणी अर्ज बैलगाडीतून सादर
Next Article सोलापूर ग्रामीण भागाला दिलासा








