तरुण भारत संवा़द प्रतिनिधी / पंढरपूर
विठूनाम अन् ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात आज पंढरपुरातून पाच रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले. यावेळी सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी पुष्पवृष्टी करून रुग्णांना निरोप दिला. प्रसंगी कोरोना रुग्णांवर उपचार केलेल्या डॉक्टर्स नर्स यांचा गुलाब पुष्प देऊन प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
प्रसंगी पोलीस उपाधीक्षक डॉ. सागर कवडे ,मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले उपस्थित होते. सदरचे पाच रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेल्याने सद्यस्थितीला पंढरपुरात एकही कोरोनाचा रुग्ण उपचार घेत नाही.








