पेडणे (प्रतिनिधी ) गोवा सरकारने महाराष्ट्र राज्यातून गोव्यात येणाऱया तसेच अन्य राज्यातून गोव्यात प्रवेश करणाऱया नागरिकांना पञादेवी येथील सिमेवर आल्यानंतर त्यांची स्वॕब चाचणी करण्याचा निर्णय घेतला असून त्यांची स्वॕब चाचणी करण्यासाठी विर्नोडा येथील संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालय स्वॕब केंद्र सुरू करण्याचा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका यांनी दिल्यानंतर पेडणे तालुक्मयात तसेच विर्नोडा गावात भितीचे वातावरण पसारले. विर्नोडा पंचायतीला पूर्णपणे अंधारात ठेवून हे केंद्र सुरू करण्यासाठी विर्नोडा पंचायत मंडळाने पञकार परिषद घेऊन सरकारच्या निर्णयाचा तीव्र विरोध करत हे स्वॕब केंद्र सरकारने मंञ्याच्या सरकारी बंगल्यावर सुरू करावे अशी मागणी करत सरकारच्या या कृतीचा निषेध करत स्वॕब केंद्र हे महाविद्यालयात न करता मंञ्याच्या सरकारी बंगल्यावर करा असे सांगितले
ड़ विर्नोडा पंचायत कार्यालयात घेतलेल्या पञकार परिषदेला सरपंच प्रशांत राव , उपसरपंच अपर्णा परब , पंचसदस्य भरत गावडे , मंगलदास किनळेकर ,शैलेंद्र परब व अनुपा कांबळी उपस्थित होत्या.
ड़ म्हापसा येथील उत्तर गोवा आझिलो इस्पितळात गोवा बाहेरून येणाऱया व्यक्तीसाठी स्वॕब केंद्र सुरू करुन चाचणी केली जात होती. या ठिकाणी अतिरिक्त ताण वाढत असल्याने सरकारने विर्नोडा पेडणे येथील सरकारी महाविद्यालयात स्वॕब केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला.व तसा आदेशही उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका यांनी दिल्याने विर्नोडा गावात खळबळ माजली.
ड़ विर्नोडा येथील नागरिकांना कोरोना लागण झाल्यास त्या जबाबदार दोन्हीही आमदार आणि सरकार असणारः सरपंच प्रशांत राव
यावेळी बोलताना सरपंच प्रशांत राव यांनी सांगितले की विर्नोडा येथील सरकारी महाविद्यालयात कोरोना या रोगाची स्वॕब चाचणी केंद्र करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. याबाबत विर्नोडा पंचायतीला पूर्णपणे अंधारात ठेवले. ज्यावेळी आम्हाला ही गोष्ट कळली त्यावेळी पंचायतीच्या वतीने पेडणे उपजिल्हाधिकारी , पेडणे मामलेदार तसेच तुये आरोग्य केंद्र अधिकारी यांना पञ देऊन हे केंद्र सुरु केल्यास महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या जीवितासधोका आहे तसेच गावातीला नागरिकांना यापासून संसर्ग होऊन कोरोना रोगाची लागण होऊ शकते यासाठी हे केंद्र सुरु करु नये असे कळविले होते. माञ विर्नोडा पंचायतीला आंधारात ठेवून सरकारच्या उत्तर गोवा जिल्हाधिकारी यांनी या ठिकाणी येऊन या जागेची पाहाणी करत हे केंद्र सुरू करण्याचा आदेश दिला असून हा निर्णय चुकीचा असून यामुळे विर्नोडा गावात भितीचे वातावरण पसरले आहे. गावातील तसेच पेडणे तालुक्मयातील विद्यार्थ्यांचे पालक भयभित झाले असून याचा परिणाम विद्यार्थ्यांच्यावर होणार आहे. पेडणे तालुक्मयात दोन आमदार आहेत. त्यापैकी बाबू आजगावकर हे उपमुख्यमंञी आहेत , त्यानीही याला विरोध करणे गरजेचे असून जर विर्नोडा आणि पेडणेत कोरोनाची लागण झाल्यास दोघांनाही तसेच सरकारला जबाबदार धराले जाईल असा इशारा, सरपंच प्रशांत राव यांनी दिला आहे.

ड़ सरकारने मंञ्याच्या सरकारी बंगल्यात किंवा साखंळी येथील रविंद्र भवनात हे स्वॕब केंद्र सुरु करावेः प्रशांत राव
सरपंच प्रशांत राव म्हणाले संत सोहिरोबानाथ आंबिये हे सरकारी महाविद्यालय जरी असले तरी या ठिकाणी पेडणे तालुक्मयातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या ठिकाणी हे केंद्र सुरु करण्यास आमचा विरोध असून चांगल्या गावाला वाईट करण्याचा हा प्रकार आहे. सरकारने हे केंद्र मंञ्यांच्या सरकारी बंगल्यावर सुरू करावे किंवा साखंळी येथील रवींद्र भवनात सुरु करावे. सरकारची जी मालमत्ता आहे ती लोकांची मालमत्ता आहे. तिथे स्वॕब केंद्र सुरु करावे असे प्रशांत राव म्हणाले.
ड़ पंचायतीला किंमत देत नसल्यास पंचायती बरखास्त कराः माजी सरपंच तथा विद्यमान पंचसदस्य ः भरत गावडे
यावेळी बोलताना भरत गावडे म्हणाले कोरोनाचे स्वॕब केंद्र महाविद्यालयात सुरु करण्याचे आम्हाला कळल्यानंतर पंचायतीने लगेच पञं पाठवून विरोध कळविला.माञ आमच्या पञाला काहीच किंमत दिली नाही.साधी विचारणाही केली नाही. आम्ही निवडून आलो म्हणून लोक आम्हाला याचा विचारतात आम्ही काम उत्तर त्यांना द्यावे. पःचायतीला डावलून हा निर्णय घेतला गेला. जर पंचायतीला काहीच अधिकार नाहीत” तर सर्व गोवा राज्यातील पंचायती बरखास्त करा ल फक्त मंञ्यानाच ठेवा व त्यानीच सर्व काही ते करावे असे भरत गावडे म्हणाले.
ड़ विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मनात भिती निर्माण होणारः पंच शैलेश परब
यावेळी बोलताना पंच शैलेश परब म्हणाले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या 1 जुलैपासून होणाऱया परीक्षा बाबत या स्वॕब केंद्रामुळे भितीचे वातावरण पसरले आले. या केंद्रामुळे विविध राज्यातील व्यक्ती गोव्यात पञादेवी येथे प्रवेश केल्यानंतर इथे आणून स्वॕब चाचणी केल्याने विद्यार्थी तसेच इतरानाही आमच्या परिसरातील लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो यासाठी हे केंद्र सरकारने अन्य ठिकाणी न्यावे अशी मागणी केली.









