प्रतिनिधी / म्हापसा
आसगाव बार्देश येथे छोटय़ा ‘हट’ना आग लागली. यात दोन हट पूर्णपणे जाळून खाक झाल्या. पीळर्ण व म्हापसा अग्निशामक दलांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणल्याने सुमारे 35 लाखांची मालमत्ता वाचविण्यात यश आहे.
वेल्डिंग काम सुरू असताना ही आग लागली असल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून आले. घटनास्थळी आठ हट होत्या. त्यापैकी दोन हटना आग लागली. अग्निशामक दलाच्या जवानांनी त्वरित आगीवर नियंत्रण मिळविल्याने उर्वरित हट आगीपासून वाचल्या. म्हापसा अग्निशामक दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव यांच्या मार्गदर्शनाखाली ही आग विझविण्यात आली.