अडकून पडलेल्यांपेक्षा परप्रांतीय मजुरांची संख्या जास्त
प्रतिनिधी / सांगली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर गेल्या महिन्याभरात एक लाख चाळीस हजारांवर नागरिकांनी जिल्हा सोडला आहे. यामध्ये विविध कामांसाठी आल्यानंतर अडकून पडलेल्यांपेक्षा परप्रांतीयांची संख्या मोठी आहे.
लॉकडाऊनमुळे सांगली जिह्यातील अनेक व्यक्ती राज्याबाहेर व राज्यातील अन्य जिह्यात अडकून पडल्या आहेत. या व्यक्तींना त्यांच्या स्वगृही जाता यावे यासाठी शासनाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. 4 जूनपर्यंत सांगली जिह्यातून राज्याबाहेर व अन्य जिह्यात जाणाऱयांची संख्या 1 लाख 40 हजार 691 असून सांगली जिह्यात राज्याबाहेरून व राज्यातील अन्य जिह्यातून येणायांची संख्या 55 हजार 906 आहे. अशा ये जा करणाऱया व्यक्तींची संख्या 1 लाख 96 हजार 596 इतकी झाली आहे, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिली.
जिह्यातून राज्याबाहेर जाणार्या 37 हजार 492 व्यक्ती आहेत तर राज्यातील अन्य जिह्यात जाणाऱया 1 लाख 3 हजार 199 व्यक्ती आहेत. जिह्यात राज्याबाहेरून येणाऱया 12 हजार 444 व्यक्ती आहेत तर राज्यातील अन्य जिह्यातून येणाऱया 43 हजार 462 व्यक्तींचा समावेश आहे.