तरुण भारत संवाद प्रतिनिधी / उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. आज जिल्ह्यात 12 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 45 स्वॅब तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठवण्यात आले होते. सर्व रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. यातील बारा पॉझिटिव्ह, 4 अनिर्णित व 29 निगेटिव आले आहेत.
आठ पेशंट शिराढ़ोन ता.कळंब येथील असून हे सर्व पूर्वीच्या पेशंटच्या संपर्कातील आहेत. दोन रुग्ण हासेगाव ता. कळंब येथील पूर्वीच्या आंदोरा येथील पेशंटच्या संपर्कातील आहेत. असे एकूण दहा पेशंट कळंब तालुक्यातील आहेत व दोन पेशंट ढोकी ता उस्मानाबाद येथील असून ते पुणे रिटर्न आहेत.









