प्रतिनिधी/ बेळगाव
सोमवारपासून न्यायालयीन कामकाजाला सुरुवात करण्यात आली. तब्बल दोन महिन्यांनंतर न्यायालयीन कामकाजाला प्रारंभ झाला. मात्र, न्यायालयात पक्षकारांना प्रवेश देण्यात आला नाही. केवळ वकिलांना प्रवेश दिला गेला. त्यामुळे पक्षकारांना प्रवेशद्वाराच्या बाहेरच थांबावे लागले होते.
न्यायालयीन कामकाज 23 मार्चपासून पूर्णपणे बंद होते. महत्त्वाच्या खटल्यांचे कामकाज ऑनलाईनच्या माध्यमातून करण्यात आले होते. त्यानंतर आता या न्यायालयीन कामकाजाला सुरुवात झाली आहे. असे असले तरी केवळ वकिलांनीच आपला युक्तिवाद मांडायचा आहे. पक्षकारांची साक्ष तसेच इतर साक्षीदारांची साक्ष घेण्यास अजूनही निर्बंध आणण्यात आले आहेत. त्यामुळे न्यायालयीन कामकाज वकीलच पाहत आहेत.
न्यायालयात प्रवेश नसल्यामुळे पक्षकारांनी प्रवेशद्वारावर गर्दी केली होती. पोलिसांनी गेट बंद करून आत प्रवेश नाकारला होता. त्यामुळे पक्षकारांतून नाराजी व्यक्त होत होती. वकिलांना भेटून चर्चा करून पक्षकार माघारी फिरत होते.
ज्ये÷ वकिलांकडून नाराजी न्यायालयामध्ये 65 पेक्षा अधिक वय झालेल्या वकिलांना खटले चालविण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. कोरोना असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश बजावला आहे. मात्र या निर्णयाविरोधात ज्ये÷ वकिलांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आम्हाला खटला चालविण्यास मुभा मिळत नसेल तर मासिक वेतन द्यावे, अशी मागणी त्या वकिलांनी केली आहे









